• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • BREAKING: जनरेटरच्या धुरात गुदमरून 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

BREAKING: जनरेटरच्या धुरात गुदमरून 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

Chandrapur 6 killed due to suffocation in generator smoke: चंद्रपुरात जनरेटरमुळे निर्माण झालेल्या धुरात 6 जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 13 जुलै: वीज गेल्यानंतर अनेकदा जनरेटचा वापर कऱण्यात येतो. मात्र, अशाच प्रकारे जनरेटरचा वापर हा नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. चंद्रपुरातील दुर्गापूर (Durgapur, Chandrapur) भागात जनरेटरच्या धुरात गुदमरुन तब्बल सहा जणांचा मृत्यू (6 died due to suffocation of Generator smoke) झाला आहे. दुर्गापूर परिसरात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून कुटुंबातील 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झालाय. दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. 3 मधील ही घटना असून मयत सर्व मजूर वर्गातील सदस्य आहेत. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. या धुरामुळे त्यांचे श्वास गुदमरले. सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणले गेले आहेत. रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20 लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 अशी मृतांची नावे आहेत. दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य बचावला असून पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केलाय.
  Published by:Sunil Desale
  First published: