• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • चटका लावणारी घटना; 5 मित्र आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडले, मात्र फक्त दोघेच माघारी परतले

चटका लावणारी घटना; 5 मित्र आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडले, मात्र फक्त दोघेच माघारी परतले

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:
हैदर शेख, चंद्रपूर, 21 नोव्हेंबर : लहान मुलांमध्ये आपला छंद जोपासण्याचा उत्साह असतो. मात्र कधी-कधी हाच छंद त्यांच्यासाठी जीवघेणाही ठरतो. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट येथे घडली आहे. या परिसरात वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. घुग्गुस येथील आमराई वॉर्डातील ही मुले नदीवर पोहण्यासाठी पोहोचली होती. नदीत उड्या घेताच यातील 4 मुले बुडू लागली. कुणीही मदतीला न आल्याने पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम आणि प्रचल वानखेडे ही मुले बुडाली. तर पाचपैकी सुरज या मुलाने एका मुलाला बुडताना वाचविले. ही मुलं 15 ते 16 वर्ष वयोगटातील आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने 3 जण बुडाले तर 2 जण बचावले आहेत. घुग्गुस पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाची चमू नदीत बुडालेल्या मुलांचा शोध घेत आहेत. हेही वाचा - बलात्काराच्या आरोपामुळे इंजिनिअर तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त; 7 वर्षांनंतर DNA टेस्टमुळे झाला मोठा खुलासा दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच मुलांच्या उत्साहाच्या भरात होणाऱ्या या घटना टाळण्यासाठी पालकांनीही आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज या घटनेनंतर अधोरेखित झाली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: