Home /News /maharashtra /

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरच नाही; दीड तास तडफडून मुलीचा मृत्यू, चंद्रपुरातील संतापजनक घटना

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरच नाही; दीड तास तडफडून मुलीचा मृत्यू, चंद्रपुरातील संतापजनक घटना

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी तरुणीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 22 ऑगस्ट : महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयात (Government Hospital) डॉक्टरांच्या अभावी 17 वर्षीय मुलीचा उपचाराविना तडफडून मृत्यू (17 year old girl died due to lack of medical treatment) झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात (Chandrapur Civil Hospital) ही संतापजनक घटना घडली आहे. डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात मुलीला आपले प्राण गमवावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील 17 वर्षीय सानिका अनमूलवार (Sanika Anmulvar) हिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये तिला दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यात आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरच आले नाहीत आणि त्यामुळे दीड तास तडफडून सानिकाचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. MHADA करणार तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण; 8984 घरांसाठी बंपर लॉटरी, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज शनिवारी दुपारी 12 वाजता सानिकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, दुपारी 3.30 वाजेपर्यंत तपासणीसाठी आणि उपचारासाठी डॉक्टरच आले नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. जिल्हा रुग्णालयात दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नाहीत याविषयी संताप व्यक्त होत आहे. यावर जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठातांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये. सानिकाची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूत दाखल करण्याऐवजी जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांची पदे आणि पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सानिकाच्या मृत्यूला जबाबदार कोण? आणि कोणावर कारवाई होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र राज्याचा नवा विक्रम, एकाच दिवशी 10 लाखांहून अधिक Vaccination; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलं, जेव्हापासून रुग्णालयाचा कारभार हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देऊन मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले तेव्हापासून अशाप्रकारे असुविधा सुरू झाली आहे. आमची मागणी आहे की रुग्णालयात पूर्णवेळ अधिष्ठाता देण्यात यावा.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Chandrapur

    पुढील बातम्या