मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Chandrapur : अबब! चक्क मजुराच्या खात्यात जमा झाले 100 कोटी, पण त्या पैसाचे पुढे काय झाले…

Chandrapur : अबब! चक्क मजुराच्या खात्यात जमा झाले 100 कोटी, पण त्या पैसाचे पुढे काय झाले…

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या एका मजुराच्या बँक खात्यात एवढे पैसे जमा झाले कि त्याला त्यातील आकडेही मोजता येतील का नाही याची शंका होती.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या एका मजुराच्या बँक खात्यात एवढे पैसे जमा झाले कि त्याला त्यातील आकडेही मोजता येतील का नाही याची शंका होती.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या एका मजुराच्या बँक खात्यात एवढे पैसे जमा झाले कि त्याला त्यातील आकडेही मोजता येतील का नाही याची शंका होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chandrapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

चंद्रपूर, 04 सप्टेंबर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या एका मजुराच्या बँक खात्यात एवढे पैसे जमा झाले कि त्याला त्यातील आकडेही मोजता येतील का नाही याची शंका होती. तब्बल 99 कोटी 98 लाख 106 रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. ही रक्कम कशी जमा झाली त्याचे करायचे काय या सगळ्याचा त्या मजुरासह गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात या घटनेने चर्चेचा विषय झाला आहे.दरम्यान  ज्या खात्यातून पैसे आले होते त्याच खात्यात बँकेच्या माध्यमातून पैसे परत पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नागभीड तालुक्यातील मांगली येथील रहिवासी राजू देवरा मेश्राम (40) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मेश्राम यांचे बॅँक ऑफ इंडिया नागभीड येथील शाखेत खाते आहे त्यांच्या या बँक खात्यात 99 कोटी 98 लाख 106 रुपये जमा झाल्याचा त्यांना मेसेज आला. मेसेज पाहून त्याना पहिल्यांदा काही समजले नसल्याने त्यांनी गावातील काही जाणकारांना दाखवले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान याबाबत बँकेच्या ही बाबत लक्षात आल्यानंतर तातडीने पावले उचलण्यात आले.

हे ही वाचा : Life@25 - मित्राला पैसे दिले पण तो आता परत करण्याचं नावच घेत नाहीये, काय करायचं?

काल (दि. 03) बँक ऑफ इंडियाच्या नागभीड शाखेतून राजू मेलाम यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्यात आला. या वेळी बँक अधिकाऱ्यांनी तुमच्या बँक खात्यात 99 कोटी 98 लाख 106 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच इतकी मोठी रक्कम कशी जमा झाली याबाबत तुम्ही खुलासा करा असे सांगण्यात आले. बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम हे घाबरून  लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.

हे ही वाचा : पीएम कन्या आर्शिवाद योजनेअंतर्गत 5000 रुपये मिळणार? व्हायरल मेसेजवर सरकारने सांगितलं...

बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता मेश्राम यांनी प्रामाणिकपणाने ही रक्कम आपली नसून चुकून आली असावी, असे बँक अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी नंतर ज्या खात्यातून ती रक्कम आली त्याच खात्यामध्ये ती वळती केली, असे राजू मेश्राम यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची दिवसभर चर्चा सुरू असतानाच ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

First published:

Tags: Chandrapur, Money, चंद्रपूर chandrapur, चंद्रपूर जिल्ह्यात