मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंद्रकांत पाटलांचं खातं कट, विखे पाटलांवर मोठी जबाबदारी?

चंद्रकांत पाटलांचं खातं कट, विखे पाटलांवर मोठी जबाबदारी?

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 10 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याची आपण कल्पना कधी केली नसेल. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी अखेर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. या खातेवाटपात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना कदाचित हव्या असणाऱ्या खात्याचं मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद हवं आहे. त्यासाठी ते आग्रही होते. पण ते खातं त्यांच्याऐवजी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चंद्रकांत पाटील हे युती सरकारच्या काळात महसूल मंत्री होते. त्यामुळे त्यांना यावेळी सुद्धा महसूल विभागाचं मंत्रीपद हवं होतं. त्यासाठी ते आग्रही होते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महसूल विभागाची जबाबदारी ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. या मंत्रिमंडळ विस्तारात गुजरात पॅटर्न अवलंबला जाणार, अशी चर्चा होती. त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. पण अखेर काल चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागला. पण चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद मिळणार नाही, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. (चंद्रकांत पाटलांकडे महसूल तर रवींद्र चव्हाण कॅबिनेटमध्ये? कुणाला मिळणार कोणते खाते?) दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिकृत खातेवाटपाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्री मिळणार नसलं तरी त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचं मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या 'या' नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली सुधीर मुनगंटीवार सुरेश खाडे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील मंगलप्रभात लोढा अतुल सावे विजयकुमार गावित गिरीश महाजन शिंदे गटाच्या 'या' नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तानाजी सावंत दादा भुसे दीपक केसरकर संजय राठोड उदय सामंत शंभुराज देसाई गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार संदिपान भुमरे
First published:

Tags: BJP, Chandrakant patil

पुढील बातम्या