लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आम्ही पिंगा घालायला लावला - पाटील

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आम्ही पिंगा घालायला लावला - पाटील

चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीत तळ ठोकून पवारांना घाम फोडला होता.

  • Share this:

असिफ मुरसल, सांगली 23 जून : महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पुन्हा एकदा निशाणा साधलाय. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना भाजपने जेरीस आणलं. ते थोडक्यात वाचले. त्यांना बारामतीत अडकवून तिथेच पिंगा घालायला लावला. पवारांचे बालेकिल्ले उध्वस्त केले अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. शिवसेना आणि भाजप म्हणजे ताटात आणि वाटीत असं आहे. यापुढे युती अभेद्य राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

सांगलीच्या कवठेपिराण गावात हिंद केसरी मारुती माने यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ , आदर्श सरपंच भीमराव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे आम्ही सर्व बालेकिल्ले उधवस्थ केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले, मात्र ते थोडक्यात वाचले. त्यांना तिथेच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उध्वस्त केल्याचं सांगितलं.

यावेळी भाजपा सेना युतीबाबत बोलताना ते म्हणाले, भाजपा सेनेची युती अभेद्यच राहणार आहे. एखादा नेता सेनेतून भाजपात आला तर सेना नेत्यांनी वाईट वाटून घेऊन नये. कारण ताटात काय आणि वाटीत काय सारखेच असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सेना नेत्यांना चिमटाही काढला. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांच दादा हे बारामतीत तळ ठोकून होते.

महाराष्ट्रात पुन्हा पेटणार काका पुतण्याचं राजकारण

राष्ट्रवादीच्या विधानसभा आढावा बैठकीत बीड विधानसभेसाठी संदीप क्षीरसागर यांना शरद पवारांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संदीप क्षीरसागर यांचे काका मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करा असा आदेश संदीप यांना देण्यात आलाय.

यापू्र्वी बीड जिल्हात गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतणे वाद रंगला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातही बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या काक पुतण्या वाद रंगला होता. आता बीड विधानसभेसाठी जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी जयदत्त क्षीरसागर यांना बळ देणार आहे.

संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही दिवसआधीच जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आपल्याला कमी महत्त्व दिले जाते असं जयदत्त क्षीरसागर यांना वाटत होतं. तिथे धनंजय मुंडे यांचं वजन वाढत असल्याने त्या दोन नेत्यांमध्ये फारसं सख्य नव्हतं.अनेक दिवस तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने बदलतं राजकारण ओळखून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मंत्रिमंडळविस्तारात त्यांना कॅबिनेटमंत्रीपदही मिळालं.

First published: June 23, 2019, 11:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading