कर्जमाफीतील दिरंगाईला सरकार जबाबदार नाही-चंद्रकांत पाटील

कर्जमाफीतील दिरंगाईला सरकार जबाबदार नाही-चंद्रकांत पाटील

त्यातच चंद्रकांत दादांनी असं विधान केलं आहे. तसंच कर्जमाफीला आणखी 15 दिवस लागतील असं ते पुढे म्हणाले.

  • Share this:

उस्मानाबाद,23 नोव्हेंबर: कर्जमाफी दिरंगाईला सरकार जबाबदार नाही असं वादग्रस्त विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.

कर्जमाफीतले घोळ संपता संपत नाही आहेत. अनेक शेतकऱ्यांना रक्कमच मिळालेली नाही. तर अनेक शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम सरकारने लगोलग परत घेतली आहे. त्यातच चंद्रकांत दादांनी असं विधान केलं आहे. तसंच कर्जमाफीला आणखी 15 दिवस लागतील असं ते पुढे म्हणाले. पण मग सरकार जबाबदार नाही तर कोण जबाबदार आहे, ते मात्र त्यांनी सांगितलं नाही.

तसंच रिलायन्स व टाटा सारख्या खासगी कंपनी यांच्या मार्फत सोयाबीन उडीद मूग व इतर धान्य विकत घेण्याचा प्रस्ताव सरकारने मांडलाय.  सरकार या प्रस्तावावर विचार करीत असून येत्या वर्षीपासून त्याच्यावर अंमलबजावणी होणार आहे.

First published: November 23, 2017, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading