...जेव्हा चंद्रकांत पाटील गातात कोळी गीत!

...जेव्हा चंद्रकांत पाटील गातात कोळी गीत!

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी चक्क कोळी गीत गायलं आणि सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

01 जानेवारी : जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत होत असतानाच नवीन वर्षानिमित्त कायम महसूल आणि राजकारणावर बोलणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी चक्क कोळी गीत गायलं आणि सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

'तुझी माझी... जमली जोडी' हे कोळी गीत चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात गायलं. नेहमी राजकारणावर भाष्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना गाणं गाताना पाहून सगळ्यांनीच त्यांच्यासोबत ताल धरला. याच निमित्तानं महसुल मंत्र्यांचा एक हटके अंदाज सगळ्यांनाच पहायला मिळाला.

कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या सावली केअर सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सेंटरमध्ये अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. अशा प्रकारचं काम करणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे. तिथेच दादांनी सगळ्यांसाठी गाणं गायलं. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी नववर्षाचं जंगी स्वागत केलं असंच म्हणावं लागेल.

First published: January 1, 2018, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading