मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंद्रकांत पाटलांनी आता खरंच हिमालयात जायला पाहिजे, सेनेच्या मंत्र्याचा टोला

चंद्रकांत पाटलांनी आता खरंच हिमालयात जायला पाहिजे, सेनेच्या मंत्र्याचा टोला'मी जर कोल्हापूरमधन निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन', असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

'मी जर कोल्हापूरमधन निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन', असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

'मी जर कोल्हापूरमधन निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन', असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

  • Published by:  sachin Salve

औरंगाबाद, 06 डिसेंबर : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. महाविकास आघाडीने भाजपला हादरा देत फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला आहे. पदवीधर निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांवर चांगलेच तोंड सुख घेत आहे. सेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याच्या विधानाची आठवण करून दिली.

'मी जर कोल्हापूरमधन निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा समाचार घेत अब्दुल सत्तार म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जायला पाहिजे. ते जर तिकडे गेले तर आम्ही त्यांची पूर्ण व्यवस्था करू' असा टोला लगावला. ते औरंगाबादमध्ये बोलत होते, असं वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले आहे.

Covid 19 Pfizer-BioNTech vaccine : भारतात आपात्कालीन वापरासाठी मागितली परवानगी

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मुद्यावरून त्यांनी वारंवार राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना टोमणे मारत होते.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

'विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश मला पक्षाने दिला. तुम्ही पुण्यातून निवडणूक लढवावी असं मला त्यावेळी अमित शहा यांनी सांगितलं होतं. त्यावर मी त्यांच्यासोबत बराच युक्तिवाद केला. कोल्हापूर सोडून गेलो तर चुकीचा संदेश जाईल असं मी म्हणालो. पण सगळा युक्तिवाद ऐकून झाल्यावर त्यांनी मला कोथरूडमधूनच निवडणूक लढण्याचा आदेश दिला.

धर्म की विज्ञान, महत्त्वाचं काय? IAS मुलाखतीत दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क

'पक्षाने आदेश दिल्यावर तो अंतिम असतो. त्यामुळे मी लढलो असंही पाटील यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातून ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लढवावी, त्यात जिंकून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल', असं आव्हानही त्यांनी दिलं.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Shivsena, चंद्रकांत पाटील, भाजप, शिवसेना