Home /News /maharashtra /

''उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही'', चंद्रकांत पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

''उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही'', चंद्रकांत पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केला.

    कोल्हापूर, 12 सप्टेंबर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केला. उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असे मला कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्र्यांने सांगितलं, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. कोल्हापूरात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावर आज शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच काय तर, इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाली आहे. याची आम्हाला कल्पनाही नव्हती. एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी? असंही कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री मला म्हणाले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य नेमकं कोणत्या मंत्र्याबाबत केलं आहे याचा अंदाज बांधणं कठिण आहे. ठरलं तर! अखेर सुरेखा पुणेकर हातावर बांधणार ''घड्याळ'' संजय राऊतांची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री त्याचं नाव सांगावं, असा हल्लोबाल संजय राऊतांनी केला आहे. पाटलांना अफवा पसरवण्यात आनंद मिळतो, असंही राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवत असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा, असा टोला संजय राऊतांनी पाटलांना लगावला आहे. ''टार्ग्रेट पूर्ण करा, गळ्यात फुलांची माळ पडेल नाहीतर...'', नितीन गडकरींची शास्त्रज्ञांसह प्राध्यापकांना तंबी महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं, असं म्हणत राऊतांनी पाटलांवर हल्ला चढवला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Chandrakant patil, Sanjay Raut (Politician), Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या