मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते, आज साहेब असते तर..." : चंद्रकांत पाटील

"क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते, आज साहेब असते तर..." : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, "क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते, आज साहेब असते तर..."

चंद्रकांत पाटील म्हणाले, "क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते, आज साहेब असते तर..."

Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे पत्रकारांसोबत संवाद साधताना आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असल्याचंही म्हटलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

सोलापूर, 29 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझ पार्टीवर एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने बाळासाहेबांची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही आपल्याला बाळासाहेबांची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रांती रेडकरच नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही वारंवार बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब असते तर त्यांनी काठी घेऊन सगळ्यांना बरोबर केलं असतं. 1995 ते 1999 काळात सरकार असताना कुणाची हिंमत होत नव्हती कोणाची... बाळासाहेब चुकणाऱ्या मंत्र्यांना मातोश्रीवर बोलवत असतं.

वाचा : हिवाळी अधिवेशनात गोप्यस्फोट करणार, मोठ-मोठी नावे समोर येणार - नवाब मलिक

क्रांतीने काय म्हटलं आहे पत्रात?

क्रांती रेडकर हिने तिच्या कुटुंबीयांना होणारा त्रास या पत्रात नमूद केला आहे. तिने असं म्हटलं आहे की- 'माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले... कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे... सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायंत.'

तिने पुढे असं म्हटलं आहे की, 'मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही. आणि मला यात पडायचंसुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.'

बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत क्रांती या पत्रात म्हणाली आहे की, 'आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं... एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरुप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे... आज ते नाही पण तुम्ही आहात... त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो... तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे... तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे... म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय... तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती. आपली बहिण, क्रांती रेडकर.'

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Shiv sena, Solapur