आमचं काय चुकलं? भाजपमुक्त जिल्ह्यावर कोल्हापूरकरांना चंद्रकांत दादांचा प्रश्न

आमचं काय चुकलं? भाजपमुक्त जिल्ह्यावर कोल्हापूरकरांना चंद्रकांत दादांचा प्रश्न

राज्यात 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागा जिंकता आल्या नाहीत. तर शिवसेनेला एकच जागा राखता आली. या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

  • Share this:

कोल्हापूर, 27 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागा जिंकता आल्या नाहीत. तर सेनेची गेल्यावेळी असलेली सहा आमदारांची संख्या एकावर आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असूनही त्यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली. कोथरूड मध्ये विजय मिळवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्यांचा कोल्हापूरचा गड मात्र राखता आला नाही. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पराभवाला बंडखोरी कारणीभूत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पुण्यातून निवडून आलो असलो तरी कोल्हापूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. कोल्हापूरातवर ज्यांनी टोल लादला त्यांना मते आम्ही हटवला तर आम्हाला नाही. शहर बकाल केलं त्यांना मते पण आम्ही सुंदर शहर केलं तरी मतं नाहीत. आमचं कुठं चुकलं असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेला पाठिंबा देऊन त्यांचे सरकार स्थापन करतील अशी चर्चा राज्यात रंगली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसला हात लावला की चटका बसतो. ते लोक फसवे आहेत हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेससोबत जाणार नाही असंही चद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरात महायुतीला बंडखोरीचा फटका बसला. सेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदारांनी महायुतीला मदत केली नाही. असा आरोप करताना चंद्रकांत पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीका केली. संजय मंडलिक यांना खासदारकीला मदत केली म्हणून त्यांनी काँग्रेसला मदत केली याचा फटका बसल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. आता जिल्ह्यातील सेनेच्या मूळ लोकांनी एकत्र येऊन सेना भक्कम करा असं आवाहन केलं. कोल्हापूर मध्ये खासदार सेनेचे मग त्यांची मते विधानसभा वेळी कुठं गेली ? असा प्रश्न त्यांनी विचारला.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत कोल्हापूरच्या लोकांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध जातात म्हणून कोल्हापूरची प्रगती नाही. एकूण राज्याच्या निकालावर आत्मपरीक्षण करू पण निकाल चिंताजनक नाही.

राज्यात सर्वात धक्कादायक निकालामध्ये परळीचा पंकजा मुंडेंचा आणि उदययनराजेंचा पराभव ठरला. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे. त्यांची काळजी आम्ही घेऊ आणि सन्मानही दिला जाईल.

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

Published by: Suraj Yadav
First published: October 27, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading