शिवसेनेचा पत्ता कट? मोदींसमोर चंद्रकांत पाटील म्हणतात, फडणवीसच पुन्हा होणार मुख्यमंत्री!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'चा नाशिकमध्ये समारोप होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 02:31 PM IST

शिवसेनेचा पत्ता कट? मोदींसमोर चंद्रकांत पाटील म्हणतात, फडणवीसच पुन्हा होणार मुख्यमंत्री!

नाशिक, 19 सप्टेंबर : 'देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रमही ते मोडतील,' असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'चा नाशिकमध्ये समारोप होत आहे. यावेळी भाजपच्या सर्वच नेत्यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्याचा दावा केला आहे. शिवसेनेकडून याआधी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आलेला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मात्र चंद्रकांत पाटील यांनी युतीची घोषणा होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्याने शिवसेना आता काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावं लागेल.

शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यातच युतीबाबत थेट वक्तव्य करून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही रावतेंचं समर्थन केलं आहे.

'जर युतीत शिवसेनेला समान जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल,' असं म्हणून दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली होती. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आधी 50-50 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यामुळे दिवाकर रावते जे बोलले त्यात काहीही चुकीचं नाही.'

शिवसेनेवर कुरघोडीचा भाजपचा प्रयत्न

Loading...

संपूर्ण राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. त्यात भाजप शिवसेनेची युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये वाद आहे. जागावाटपाचा फार्म्युला हा समसमान असणार की शिवसेनेला भाजप 115 ते 120 मतदारसंघच देणार, यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे.

बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...