• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांवर गेल्या आठवड्यात एका महिलेने आरोप केले आहेत, त्याची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी केली पाहिजे- अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे

 • Share this:
  मुंबई, 24 एप्रिल: चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली आहे. संजय राऊतांवर गेल्या आठवड्यात एका महिलेने आरोप केले आहेत, त्याची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी केली पाहिजे- अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते, तिला कुणी पाहत नाही असं वाटतं, असाच काहीसा प्रकार राऊतांचा सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी अशी मागणी करत म्हटलं आहे की, हे रोज उठून भाषण-प्रवचन नाही पाहिजे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनिल परब, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली आहे. संजय राऊतांविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर राऊतही लगेच सरकारवर टीका करत आहेत. आणि उच्च न्यायालयाने हेच राज्य सरकारच्या बाबतीत केले असता ते प्रयत्न करत असल्याचं म्हणतात. महाराष्ट्र सरकारडून प्रयत्न सुरू आहेत तर केंद्र काय झोपा काढतंय का?  हे चालणार नाही. (हे वाचा-मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसच नाही! BKC केंद्रावर मोठी गर्दी) अनिल परब आणि घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे- पाटील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर देखील घणाघाती टीका केली आहे. अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सीबीआयने घोडावत यांची देखील चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'वाझेंच्या पत्रात घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे.' यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की ते थेट अजित पवार यांचं नाव घेत नाही आहेत. केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची चौकशी करावी अशी मागणी असल्याचं ते म्हणाले.
  (हे वाचा-मुंबईतील वाहनांसाठीचा 'कलर कोड' निर्णय अखेर मागे, आता दिसणार नाहीत कोणतेच स्टीकर) अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या हाय कोर्टाच्या आदेशानुसार सीबाआयने चौकशी केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. चौकशीतून जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. सीबीआयने देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापा टाकल्याची माहिती आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: