Home /News /maharashtra /

यूपीमध्ये सेनेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, पाटलांचा राऊतांना टोला

यूपीमध्ये सेनेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, पाटलांचा राऊतांना टोला

 पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आ

पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आ

पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आ

पुणे, 08 जानेवारी : उत्तर प्रदेश, गोवा, मनिपूर आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका (Election Commission announced 5 state assembly election)  जाहीर झाल्या आहेत.  पण, निवडणुकीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आक्षेप घेतला आहे. पण, शिवसेनेला दरवेळेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात आणि ते घालवतात, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी संजय राऊत यांना लगावला. पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ' काही ठिकाणी अनेक टप्प्यात निवडणुका आणि काही ठिकाणी एकाच टप्प्यात निवडणुका ही राजकीय पक्षांची सोय पाहिली जात आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हेच पाहिलं. काही पक्षांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून या केलेल्या तडजोडी असाव्यात, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले. (बापरे! ही रेस्टॉरंटमधील सर्वात महागडी डिश आहे? किमतीऐवजी पदार्थ पाहूनच फुटेल घाम) 'उत्तर प्रदेश - गोव्यात शिवसेना निवडणुक लढवत आहेत. दरवेळी शिवसेनेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात. संजय राऊत यांना सगळ्या जगाचं कळतं. विरोधी पक्षातील नेत्यांना तलवारीच्या जोरावर धरुन आणलंय का,  की पैशाच्या जोरावर धरुन आणलंय. मग हे तुम्हाला का जमत नाही' असा टोला पाटील यांनी लगावला. (कुत्र्याच्या वाढदिवसासाठी 7 लाखांची ग्रँड पार्टी, नियम तोडल्यामुळे तिघांना अटक) तसंच, महाविकास आघाडी संविधान मानत नसले तरी आम्ही मानतो.  संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतंय. विरोधकांना त्यांच्या सोयीनुसार झालं की मग योग्य आहे.  पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, मात्र अलीकडे त्यांना कुणी सिरीयस घेत नाहीत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.  संजय राऊत नेमकं काय म्हणाले? "पाच राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा झाली आहे. मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो की, ते योग्य वेळेत निवडणुकीचं नियोजन करत आहेत. देशाची सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये ज्याप्रकारे कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्याबाबत निवडणूक आयोगाने खरंच काहीतरी अभ्यास केलेला असेल. लोकशाहीत निवडणूक वेळेवर होणं आणि वेळेवर निवडणूक घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपलं निवडणूक आयोग सक्षम आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमावली कोड ऑफ कंडक्टसाठी लावण्यात आली आहे. मला वाटतं ही नियमावली प्रत्येक राज्यासाठी असली पाहिजे. फक्त विरोधी पक्षांसाठी नियमावली लावू नये. विशेषत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील त्यांना मोठी रॅली घेण्यापासून रोखता यायला हवं. जेव्हा पंतप्रधान रॅली करण्यासाठी जातात तेव्हा जास्त गर्दी होते", असं संजय राऊत म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Chandrakant patil, चंद्रकांत पाटील

पुढील बातम्या