राजू शेट्टींनी एनडीएमध्येच राहावं, बाकी त्यांचा निर्णय -चंद्रकांत पाटील

राजू शेट्टींनी एनडीएमध्येच राहावं, बाकी त्यांचा निर्णय -चंद्रकांत पाटील

"नारायण राणे भाजपमध्ये येत असतील, तर त्यांचं स्वागतच आहे"

  • Share this:

17 आॅगस्ट : राजू शेट्टींनी एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना आणखी एक मंत्रिपद द्यावं लागेल, पण सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद काढून घेण्याची गरज नाही असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तसंच नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वादावर पहिल्यांदाच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊंची भक्कम पाठराखण केली. राजू शेट्टी राहिले तर त्यांनाही मंत्रिपद द्यावे लागेल. राजू शेट्टींनी एनडीएमध्येच रहावं, अशी आमची इच्छा आहे, पण शेवटी निर्णय त्यांचा आहे. ते एनडीएमध्ये राहिले, तर त्याचा अर्थ सदाभाऊ खोतांकडून मंत्रिपद काढून घ्यावं लागेल, असा होत नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रवेशावरही त्यांनी सुचक वक्तव्य केलं. नारायण राणे भाजपमध्ये येत असतील, तर त्यांचं स्वागतच आहे असं पाटील म्हणाले.  मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झालीय पण अजून निर्णय झालेला नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

First published: August 18, 2017, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading