राज्यात 10 लाख कर्जदार शेतकरी बोगस -चंद्रकांत पाटील

राज्यात 10 लाख कर्जदार शेतकरी बोगस -चंद्रकांत पाटील

"राज्यभरातून कर्जमाफीसाठी ७२ लाख अर्ज आले आहेत. तर राज्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एकूण ८९ लाख आहे पण..."

  • Share this:

11 सप्टेंबर : राज्यभरातून कर्जमाफीसाठी ७२ लाख अर्ज आले आहेत. तर राज्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एकूण ८९ लाख आहे पण या 89 लाख शेतकऱ्यांपैकी १० लाख शेतकरी बोगस आहेत अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीये.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केलीये. पण रोज होणाऱ्या नवनव्या निकषामुळे राज्य सरकाराच्या निर्णयावर वाद होतोय. कोल्हापूरमध्ये राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना कर्जमाफीसाठी बोगस शेतकऱ्यांचा आकडाच जाहीर केलाय. राज्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एकूण 89 लाख आहे पण या 89 लाख शेतकऱ्यांपैकी 10 लाख शेतकरी बोगस आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली.

तसंच याच्यामुळे राज्यातून ८० लाख अर्ज येतील आणि कर्जमाफीची ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आॅक्टोबर अखेर होईल, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिलीये. त्यामुळे आता सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया करायला अजून वेळ लागणार हेच स्पष्ट होतंय.

दरम्यान, राज्यातील देवस्थानच्या जमिनी ह्या रेडिरेकन प्रमाणे कुळालाच विकल्या जाणार आहेत. कुळ त्या घेण्यास सक्षम नसेल तर त्याचा लिलाव होईल. ज्या जमिनी देवस्थानच्या ताब्यात आहेत त्या जमिनी यापुढे कुणालाही देता येणार नाहीत असा कायदा लवकरच करण्यात येईल असंही चंद्रकांतदादा यांनी सांगितलंय.

First published: September 11, 2017, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading