नाथाभाऊंच्या राजीनाम्याची पुन्हा चर्चा; चंद्रकांतदादा म्हणाले, ते स्वत:चं नुकसान करणार नाहीत!

नाथाभाऊंच्या राजीनाम्याची पुन्हा चर्चा; चंद्रकांतदादा म्हणाले, ते स्वत:चं नुकसान करणार नाहीत!

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याची चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याची चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं. एवढंच नाही तर एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला असून ते येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. नाथाभाऊ पक्षाचा राजीनामा देणार नाहीत. असं करुन ते स्वत: चं नुकसान करुन घेणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, समोर आली डोकं सून्न करणारी माहिती

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट शनिवारी घेतली. एवढंच नाही तर नाथाभाऊ आणि अनिल देशमुख यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या भेटीत नाथाभाऊंचा पक्षांतराचा मुहुर्त ठरल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. या भेटीबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विश्राम गृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवारातील चार अल्पवयीन बालकांची हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या चारही मुलांवर रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या ठिकाणी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख हे एकत्र पोहोचले आहे.

योग्य वेळी उत्तर देईल...

विशेष म्हणजे, एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी खडसेंचा याचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. पण, आता एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेवर 'नो कमेंट' अशी प्रतिक्रिया देऊन गुगली टाकली आहे. 'मला सध्या याबद्दल काहीही बोलायचे नाही. योग्य वेळी उत्तर देईल', असंही एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा...BREAKING: गडचिरोलीत चकमक! C-60 कमांडोंकडून 5 माओवाद्यांचा खात्मा

दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'चर्चाही केवळ चर्चा असते. त्याचा काहीही अर्थ नसतो. एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत' असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Published by: Sandip Parolekar
First published: October 18, 2020, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading