चंद्रकांत पाटलांनी केला 'युती'बाबत मोठा खुलासा

चंद्रकांत पाटलांनी केला 'युती'बाबत मोठा खुलासा

युतीचं नेमकं खरं काय आहे याबाबतचं गुढ वाढलं आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 15 जानेवारी : भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत असतानाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युती बाबत मोठा खुलासा केलाय. भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत कुठलीही चर्चा सुरू नाही असं चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यामुळे युतीबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

युतीतबाबत उलटसुलट बातम्या येत असताना सुरूवातीला आदित्य ठाकरे यांनी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. नंतर रावसाहेब दानवे यांनी तसेच संकेत दिले. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक विधान केलं होतं. त्यामुळे युतीची पडद्या आडून चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट झालं.

मात्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. नेमकं खरं काय आहे याबाबतचं गुढ वाढलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीचं पक्क करत जागावाटपाचाही प्रश्न सोडवून टाकला. त्यामुळे काहीतरी निर्णय घ्या असा दबाव आता शिवसेनेवर वाढत जाणार आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

10 टक्के सवर्ण आरक्षणाबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना ज्या राज्यात हे आरक्षण लागू करण्यात आलं तिथली माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.

ओबीसी समाजाबद्दल यापूर्वीच खूप निर्णय घेतले आहेत. जे मराठा समाजाला दिलं तेच ओबीसी समाजाला दिलं आहे.

कर्नाटक राजकारण - कर्नाटकातल्या घडामोडींशी माझा काहीही संबंध नाही. पूर्वीही काहीही संबंध नव्हता आणि आताही नाही. मला प्रसार माध्यमांकडूनच ही माहिती मिळ्ते.

राज्यात 4 ते 5 हजार टॅंकर्स असतील अशी अपेक्षा होती पण राज्यात सध्या 1300/1400 टॅंकर्स लागत आहेत.

अगदी उन्हाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

जूनपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात तिथलाच चारा मिळेल अशी व्यवस्था केली आहे.

चारा छावण्या संदर्भात दोन दिवसात मार्गदर्शक तत्वं तयार करणार.

चारा छावण्यात कशा प्रकारे पूर्वी भ्रष्टाचार झालाय हे आपण पाहिलं आहे.

VIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना

First published: January 15, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading