संदीप राजगोळकर, कोल्हापूर 12 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय भाजपने तर राज्यातील मंत्र्यांनाच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची व्ह्युरचना केल्याची चर्चा आहे. कोल्हापूरमधून ज्येष्ठमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे शिक्षक मतदार संघाचे विधान परिषदेतील आमदार. पण ज्यावेळी राज्यात भाजप-सेनेचे सरकार आले त्यानंतर चंद्रकांत दादांचे नाव राज्यभर पोचलं. दादांवर अमित शहांचा प्रचंड विश्वास. राज्यातील दोन नंबरचे मंत्री म्हणून चंद्रकांत दादांची ओळख निर्माण झाली. मंत्रिमंडळात महसूल मंत्री पदही देण्यात आलं.
चंद्रकांत दादा हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी तालुक्यातील खानापूर गावचे. पण पहिल्यापासूनच विद्यार्थी परिषदेत काम केल्यामुळे दादा भाजपशी एकनिष्ठ राहिले.. आता भाजप पक्षाच्या रणनीती नुसार चंद्रकांत दादा कोल्हापूर मधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
याबाबत दादांनी कुठलेही संकेत दिले नाहीत. मात्र दादा मैदानात उतरले तर जोरदार लढत देऊ शकतील असंही बोललं जातंय. दादा हे लोकांमधून निवडुन येत नाहीत असा कायम आरोप केला जातो. त्यामुळे त्या आरोपांनाही दादा उत्तर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र सोडून दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा पर्याय ते स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे.
कोल्हापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून प्राध्यापक संजय मंडलिक हे संभाव्य उमेदवार असणार आहेत. मात्र युती झाली नाही तर चंद्रकांत यांच्या उमेदवारीमुळं कोल्हापूर मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा आमदार हे शिवसेनेचे आहे त्यामुळं मंत्रिपद मिळाल्यापासून चंद्रकांत दादा पाटील हे राजकारण करत असले आणि मंत्री म्हणून वावरत असले तरी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात भाजप पक्षाचा विस्तार म्हणावा तितका करता आलेला नाही आहे हेही वास्तव आहे.
VIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.