CAA ला विरोध भाजप नेत्याला पडलं महागात, पक्षाने केली मोठी कारवाई

CAA ला विरोध भाजप नेत्याला पडलं महागात, पक्षाने केली मोठी कारवाई

अनुशासनाचं कारण सांगून पक्षानं विनोद हरीभाऊ बोराडे पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

  • Share this:

परभणी, 04 मार्च : भाजपने महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील उपनगराध्यक्षांना पक्षातून काढून टाकलं आहे. भाजपा शासित नगरपालिकेत CAA - NRC - NPR विरोधात ठराव संमत करून केंद्राकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर अनुशासनाचं कारण सांगून पक्षानं विनोद हरीभाऊ बोराडे पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आपण नागरिकत्व सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशातील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कायदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने केला आहे. या कायद्याच्या विरोधात आपण नगर परिषदेत प्रस्ताव आणून त्याचे समर्थन करून आपण पक्षाविरोधी कृत्य केलं आहे. ही कृती अनुशासन भंग करणारी असून पार्टाने याची गंभीर दखल घेतली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.

एकीकडे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी महाविकास आघाडी स्थापन करून एकत्रित आले खरे, पण महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद वारंवार समोर येत आहेत. CAA, NPR, NRC मुद्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेत वेगवेगळी मतांतरं आहेत हे उघड झालं आहे, आता मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत उघड पद्धतीने मतभेद दिसत आहेत.

महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुस्लीम आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे शिवसेनेने मात्र वेगळी भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्याक आरक्षण संबंधी कॅबिनेटसमोर प्रस्तावात आला नसल्याचं सांगत आरक्षण देण्याबाबत आत्ता कोणतीच हालचाल नसल्याचे सांगितले. वास्तविक मागील आठवड्यात अधिवेशनात सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नेते नवाब मलिक यांनी राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाला आरक्षण देईल याबाबत लवकरच कायदा केला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने शिवसेनेची कोंडी करणं सुरू केलं.

भाजप पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू शकतो आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेची कोंडी केली. यामुळेच की काय शिवसेनेने तूर्तास बॅकफुट भूमिका घेतल्याचे म्हटले जाते. ठाकरे यांच्या आजच्या भूमिकेनंतर मात्र हा विकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अधिक आक्रमक झालेले आहेत.

'आघाडी सरकार असताना मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचं जाहीर केलं गेलं होतं. ती आमची वचनबद्धता आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण दिलं जाईल', अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.

मुस्लीम आरक्षणाबाबत राष्ट्रवादी आग्रही आहे अशी भूमिका एनसीपी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. एकूणच मुस्लिम समाजाचा आरक्षण कोटा महा विकास आघाडीत पेच प्रसंग निर्माण करणारा ठरेल असे दिसू लागले आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे अयोध्या वारी करत असतानाच दुसरीकडे मुस्लीम आरक्षणाची भाषा शिवसेनेची कोंडी करणारा आहे त्यामुळे तूर्तास तरी शिवसेनेने मुस्लीम आरक्षणाबाबत वेट अँड वॉच भूमिका घेतल्याचे म्हटले जाते.

First published: March 4, 2020, 9:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading