पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, सोडणार नाही!

पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, सोडणार नाही!

'आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे की नाही हे लोक ठरवतील. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो.'

  • Share this:

अद्वैत मेहता पुणे, 2 ऑगस्ट : भाजपचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना सध्या एक प्रश्न हमखास विचारला जातोय. तो प्रश्न म्हणजे तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहात का? या प्रश्नावर त्यांनी अनेकदा उत्तरं दिलीत. मात्र पुन्हा पुन्हा त्यांना तोच प्रश्न विचारण्यात येतोच. आज पुण्यातही त्यांना पत्रकारांनी  तो प्रश्न विचारलाच. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही असं त्यांनी नेहमीप्रमाणं स्पष्ट केलं. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? असा प्रश्न पुन्हा विचारला त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी गुगलीच टाकला. ते म्हणाले, मग काय सोडणार काय? दादांच्या या उत्तरावर सगळेच अवाक् झाले.

'शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, करावं तसं भरावं लागतं'

चंद्राकांत पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे की नाही हे लोक ठरवतील. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असंही ते म्हणाले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला  40 टक्के मतदारांनी शरद पवार यांना नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं. हाऊस फुल्ल चा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्यांकडे स्वतःची 10 तिकिटे असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

VIP मोबाईल नंबर देणारं रॅकेट उद्ध्वस्त; नेते,अभिनेत्यांना कोट्यवधींचा गंडा

निवडणूक आयोगाने ठरवलं तर हात वर करून आवाजी मतदानाला ही भाजप तयार आहे.मतपत्रिकेवरही लढू, कशावरही लढलो तरी आम्हीच निवडणूक जिंकू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागावाटपाचं सूत्र ठरलंय. 50-50 असं होईल.शक्यतो विनिंग  सिटिंग बदलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भूमिपुत्रांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

चंद्रकांत पाटील हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू आहेत. पाच वर्षांपर्यंत दादा हे कायम पडद्यामागे राहूनच संघटनेचं काम करत असत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर दादांना मंत्रिमंडळात क्रमांक दोनचं स्थान देण्यात आलं. तेव्हापासून दादांचं वजन भाजपमध्ये चांगलंच वाढलं. स्वच्छ चारित्र्य, लो प्रोफाईल स्वभाव यामुळे दादांना पक्षाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळालं असं जाणकार सांगत असतात.

अंधेरीतील साकिनाका भागात घरावर झाड कोसळले, 1 ठार, 2 जखमी

लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट बारामतीत जाऊन शरद पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दिलं गेलं. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातून निवडणूक लढऊन या सर्व टीकेला उत्तर देण्याचा त्यांचा विचार असल्याचं बोललं जातंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 2, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading