• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बुलेट ट्रेन प्रकल्प तर होणारच,चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना आव्हान

बुलेट ट्रेन प्रकल्प तर होणारच,चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना आव्हान

"लोकशाहीत सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांनी देखील आंदोलन करावं"

  • Share this:
30 सप्टेंबर : लोकशाहीत सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांनी देखील आंदोलन करावं, मात्र बुलेट ट्रेनचा प्रकल्प कोणत्याही परीस्थितीत होणारच असल्याचं सांगत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिलंय. मुंबईत शुक्रवारी एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झालाय.या दुर्घटनेमुळे राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनसाठी एक वीट देखील लावू देणार नसल्याचा इशारा दिलाय. त्यांच्या या वक्तव्याला चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेत कोणत्याही परिस्थिती बुलेट ट्रेन होणारच असं आव्हान दिलंय. माध्यमांच्या माध्यमातून मी शिवसेनेला सबुरीचा सल्ला द्यायचा प्रयत्न केला पण तो त्यांना जर मान्य नसेल तर मला याबाबत काहीही बोलायचं नाही असा  टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.  शिवसेनेला सल्ला दिल्यानंतर दैनिक 'सामना' मधून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.
First published: