भाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

भाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

Chandrakant Patil : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्तानं राज्य सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटील यांच्याकडे पक्षानं हे पद सोपवलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता भाजपने चंद्रकांत पाटील यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. तेव्हापासून प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, मंगळवारी (16 जुलै) चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपनं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. हे वृत्त कळताच कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करण्यासही सुरुवात केली. दरम्यान, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(पाहा :युवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद)

लोकसभा निवडणुकीनंतर दानवे केंद्रात मंत्री झाले त्यामुळे या पदावर नव्या व्यक्तीची नियुक्ती करावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये चर्चा सुरु होती.  या पदावर पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची जबाबदारी पाटील यांच्याकडे द्यावी असा विचार पक्षात सुरू होता. तसेच प्रदेशाध्यक्ष हा स्थानिक असावा ज्यामुळे त्याला निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्रात फिरता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करूनच चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सूत्रांकडून कळते. या निर्णयानुसार भाजप राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.

(पाहा :VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी)

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम असताना देखील पाटील एकाच वेळी दोन पदांवर कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील गृहमंत्रिपद आणि पक्षाचे अध्यक्षपद आहे.

(पाहा :VIDEO: जीवघेणी कसरत! दोरीवरून पार करावी लागते नदी)

फरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading