अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा

त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुजारी हटाव आंदोलन आंदोलनाला यश मिळाल असंच म्हणावं लागेल.

  • Share this:

11 सप्टेंबर : राज्याच्या येत्या हिवाळी अधिवेशनात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचा कायदा करणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीये. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुजारी हटाव आंदोलन आंदोलनाला यश मिळाल असंच म्हणावं लागेल.

येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सव तोंडावर आहे त्यामुळे पुजारी हटाव समितीच्या सदस्यांनी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी तिरुपतीचा शालू मातेच्या नात्याने स्वीकारला जाईल, त्याचबरोबर वादग्रस्त पुजाऱ्यांना नवरात्रोत्सवामध्ये गाभाऱ्यात प्रवेश देऊ नये अशी मागणी समितीने मंत्री पाटील यांच्याकडे केली.

त्यानंतर पाटील यांनी समितीला विधिमंडळात हा कायदा करून त्यानंतर मंदिरात पगारी पुजारी नेमले जातील असं आश्वासन दिलं. त्याचबरोबर नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूरमध्ये कोणतंही आंदोलन होऊ नये,  शांतता राहावी असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.

First Published: Sep 11, 2017 09:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading