Home /News /maharashtra /

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबद्दल निलेश साबळेने व्यक्त केलं मत, म्हणाला...

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबद्दल निलेश साबळेने व्यक्त केलं मत, म्हणाला...

निलेश साबळेनं राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ऐतिहासिक आघाडीच्या सरकारबाबतही भाष्य केलं आहे.

  हरिष दिमोटे, शिर्डी, 4 जानेवारी : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता निलेश साबळे शिर्डी इथं साईंच्या दरबारी दाखल झाला. यावेळी निलेश साबळेनं 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) आणि राजकीय नेत्यांचे काही किस्से सांगितले आहेत. तसंच राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ऐतिहासिक आघाडीच्या सरकारबाबतही भाष्य केलं आहे. 'मागील आणि आत्ताचे दोन्ही सरकार कलाकारांप्रती आस्था असणारे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "चला हवा येऊ द्या" ची क्लिप पाहिल्याशिवाय झोपत नव्हते. तर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आवर्जून कार्यक्रम पाहत असतात,' असं निलेश साबळेनं म्हटलं आहे. निलेश साबळे कुटुंबासह शिर्डीत साई दर्शनासाठी शुक्रवारी आल्यानंतर पत्रकारांशी त्याने संवाद साधला. आताच्या सरकारबद्दल काय म्हणाला निलेश साबळे? 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने राज्यभर पोहचलेला अभिनेता आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याने आपल्या पत्नीसह साईदरबरी हजेरी लावली. यावेळी राजकीय घडामोडींबद्दल विचारला असता त्याने विद्यमान सरकारबद्दलही भाष्य केलं आहे. 'महाविकास आघाडी सरकार हा महाराष्ट्रात नवा प्रयोग केला गेला असून राजकारणातील तीन शक्ती आता एकत्र आल्या आहेत. त्यांच्याकडून काहीतरी वेगळं घडेल ही सर्वसामान्यांना अपेक्षा आहे,' असं मत निलेश साबळेनं व्यक्त केलं आहे. भाजपच्या गोटातून मोठी बातमी, खडसेंसह पंकजा मुंडेही होणार आमदार दरम्यान, 'साईबाबांचे आशीर्वाद घेतल्यावर स्फूर्ती मिळते तर वर्षभर काम करण्याची ताकद आणि हसविण्याचं ज्ञान साईमुळे मिळते आणि म्हणूनच साईंचा आशीर्वाद घ्यायला आलो असल्याचं निलेश साबळे यानं सांगितलं आहे. निलेश साबळे आणि 'चला हवा येऊ द्या' 'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी बॉलिवूडपासून राजकीय नेत्यांची मिमिक्री आणि सहज अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे हे अभिनयासह सूत्रसंचालनाचीही जबाबदारी पार पाडतात.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Dr. nilesh sable

  पुढील बातम्या