• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'मी सभापती आहे, 1-2 मर्डर खपवू शकतो' म्हणत RTI कार्यकर्त्यावर गोळीबार, सोलापुरातील घटना

'मी सभापती आहे, 1-2 मर्डर खपवू शकतो' म्हणत RTI कार्यकर्त्यावर गोळीबार, सोलापुरातील घटना

प्रमोद ढेंगळे यांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवली होती, या वादातूनच गोळीबार केल्याचा आरोप

  • Share this:
सोलापूर, 29 जून : सोलापूर (solapur) जिल्ह्यातील बार्शी पंचायत समितीच्या सभापतीने एका आरटीआय कार्यकर्त्यावर (rti worker) गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवल्याने गोळीबार केल्याचा आरोप सभापती अनिल डिसले (anil desle) यांच्यावर करण्यात आला असून गुन्हा दाखल झाला आहे. बार्शीतील वैरागमधील जोतिबाचीवाडी गावात हा प्रकार घडला आहे. पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रमोद ढेंगळेवर गोळीबार केला.  23 जून रोजी प्रमोद ढेंगळे जोतिबाचीवाडी बस्थानकावरून आपल्या घरी रस्त्यावरुन जात होते. तेव्हा वाटेत त्यांना अनिल डिसले यांनी हाक देऊन भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर अनिल डिसले यांनी प्रमोद यांच्या डोक्यावर रिव्हॉलवर ठेवून अश्लिल शिवीगाळ सुरू केली. Twitter नं हटवला भारताचा चुकीचा नकाशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवलेला वेगळा देश 'मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे आणि पोलीस स्टेशन त्यांच्या खिश्यात आहे. या अगोदर माझ्याविरोधात ज्या तक्रारी दिल्या त्याचं पोलिसांनी काय केलं माहिती आहे, असं म्हणत अनिल डिसले याने प्रमोद यांना मारहाण केली. रस्त्यावरून तिथून जात असताना लहू डिसले या व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, वाद काही थांबला नाही. त्यामुळे  घटनास्थळावरून प्रमोद आणि एक स्थानिक लहू डिसले यांनी पळ काढला असता अनिल डिसलेने गोळीबार केला. प्रमोद ढेंगळे आपल्या घरात जाऊन लपले. त्यानंतरही आरोपीने घरासमोर येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. जास्त पगार की घरात मदत काय हवं? बायकोनेच ठरवावं आता काय हवं प्रमोद ढेंगळे यांनी  ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवली होती, या वादातूनच गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रमोद ढेंगळे यांनी पोलीस आयुक्तलय गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांच्याविरोधात  वैराग पोलीस स्टेशनमध्ये  भादवि 307, शस्त्र कायदा 3 आणि 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: