प्रसिद्ध उद्योगपती काकासाहेब चितळे यांचे निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध उद्योगपती काकासाहेब चितळे यांचे निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मिरज येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

  • Share this:

सांगली, 8 फेब्रुवारी:प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समुहाचे काकासाहेब चितळे उर्फ दत्तात्रय भास्कर चितळे यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मिरज येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. चितळे उद्योग समूहाचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती.

भिलवडीत झाली होती चितळे उद्योग समूहाची स्थापना

सांगली जिल्ह्यात असलेल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात स्वातंत्र्यपूर्व 1939 मध्ये चितळे उद्योग समूहाची स्थापना झाली. भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे हे या उद्योग समूहाचे संस्थापक. भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी चितळे उद्योग समूहाचा पाया घातल्यानंतर या उद्योग समूहाची संपूर्ण जबाबदारी पुढे काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांच्याकडे आली. काकासाहेब आणि नानासाहेब या दोन्ही बंधुंच्या रुपात चितळे यांची दुसरी पिढी या उद्योगात आली. काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीत चितळे उद्योगसमूहाची मोठी वाढ झाली. हा उद्योग समूह आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगभरात पसरला आहे. या सर्व कामगिरीचे श्रेय काकासाहेब चितळे यांना दिले जाते.

प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादनाची क्षमता..

दरम्यान, चितळे डेअरी आणि उद्योगसमूह ही एक दुग्धोत्पादक संस्था आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, दूध पाश्‍चरायजेशन, विविध दुग्ध उत्पादने तयार करण्याचे काम ही कंपनी करते. प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादन करण्याची ही कंपनी क्षमता ठेवते. ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते. महाराष्ट्र आणि भारतासह जगभरात नामांकीत म्हणून चितळे समूहाकडे पाहिले जाते. चितळे दूध, दही, तूप, भाकरवडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ही या उद्योगसमूहाची ओळख आहे.

First published: February 8, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading