पत्रकार परिषदेत खुर्ची तुटली आणि चंद्रकांत पाटील खाली कोसळले, पाहा हा VIDEO

पत्रकार परिषदेत खुर्ची तुटली आणि चंद्रकांत पाटील खाली कोसळले, पाहा हा VIDEO

खुर्ची तुटल्यामुळे चंद्रकांत पाटलांनाही हसू आवरलं नाही. मी टीका करतोय ना त्यामुळे तिकडून जरा, असं इशाऱ्याने बोलताच एकच हशा पिकली.

  • Share this:

सोलापूर, 12 फेब्रुवारी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भरपत्रकार परिषदेत खुर्ची तुटल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे ही घटना घडली.

सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख हजर होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलत असताना अचानक खुर्ची तुटण्याचा आवाज झाला आणि चंद्रकांतदादा खाली कोसळले. सुदैवाने चंद्रकांत पाटील यांनी बाकाला पकडलं त्यामुळे त्यांनी आपला तोल सावरला. त्यांच्या शेजारीच असलेले सुभाष देशमुख आणि इतर नेत्यांनी धाव घेऊन त्यांना सावरलं.

खुर्ची तुटल्यामुळे चंद्रकांत पाटलांनाही हसू आवरलं नाही. मी टीका करतोय ना त्यामुळे तिकडून जरा, असं इशाऱ्याने बोलताच एकच हशा पिकली. तसंच आता खातंही बदलंय त्यामुळे असं होतं, असा खुमासदार टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली. मात्र, शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना समोर आली आहे.

लोकल येताच अल्पवयीन मुलीने मारली ट्रॅकवर उडी, पाहा हा VIDEO

दरम्यान, बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर रेल्वे स्थानकात बदलापूर लोकल शिरत असताना अचानक एक मुलगी अचानक फलाटावरून ट्रॅकवर उतरली. यावेळी मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारले. मात्र, तरुणीला लोकलची हलकीशी धडक बसली आणि ती खाली पडली.

यानंतर मोटरमनने या मुलीला बाहेर काढत पाणी पाजून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिच्या चौकशीत ही मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आल्यानं रेल्वे पोलिसांनी तिच्या पालकांना बोलावून समजूत काढून मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

First published: February 12, 2020, 5:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या