छगन भुजबळ 10 जूनला पुण्यात करणार भाषण

छगन भुजबळ 10 जूनला पुण्यात करणार भाषण

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या वेळी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोपही होणार आहे.

  • Share this:

पुणे, 09 मे : गेली दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची तोफ १० जून रोजी धडाडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या वेळी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोपही होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भुजबळ यांचे पहिल्यांदा जाहीर सभेत सार्वजनिक दर्शन घडणार आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. भुजबळ यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पुण्याच्या सभेत भुजबळ भाजपावर हल्लाबोल करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ओबीसी चेहरे आहेत भुजबळ बाहेर आल्यामुळे मुंडेंना अधिक ताकद मिळेल हे दोन्ही नेते राष्ट्रवादीला अधिक बळकट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ते पक्षातील सुशिक्षित आणि सर्वसामान्य असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा पक्षाला फायदा होईल. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी चार वर्षे झाली होती. ते लोकसभेची तयारी करीत आहेत. त्यामुळे त्यांना मतदारसंघ बांधणीसाठी वेळ हवा होता, असंही त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र येत भाजपाचा पराभव करतील. तसंही प्रत्येक राज्यात विरोधकांच्या भाजपा विरोधी आघाड्या तयार होत आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

२०१९ मध्ये भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातून मी किंवा माझी पत्नी वर्षाबेन पटेल निवडणूक लढणार आहे. आपण कार्यकर्त्यांना तशी सूचना दिली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय.

First published: May 9, 2018, 6:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading