मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भुजबळांनी भरसभेत वाचून दाखवली भाजप सरकारमधील घोटाळ्यांची यादी, सोमय्यांना दिले चॅलेंज

भुजबळांनी भरसभेत वाचून दाखवली भाजप सरकारमधील घोटाळ्यांची यादी, सोमय्यांना दिले चॅलेंज

'किरीट सोमया नांदेडला येणार आहे, पण कशासाठी येताय, अरे मुबंईला बसून आरोप करा. पण त्यापूर्वी भाजपाचं सरकार असताना तुमच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचं काय झालं ते बघा'

नांदेड, 22 ऑक्टोबर : नांदेडमधील (nanded) देगलूर पोटनिवडणुकीच्या (deglur bypoll election) निमित्ताने राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे  'किरीट सोमया नांदेडला येण्यापूर्वी भाजपच्या काळात झालेल्या घोटाळ्याचं काय झालं ते सांगा' असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केला आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी छगन भुजबळ आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी झालेल्या प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी चौफेर तोफ डागली. 'किरीट सोमया नांदेडला येणार आहे, पण कशासाठी येताय, अरे मुबंईला बसून आरोप करा. पण त्यापूर्वी भाजपाचं सरकार असताना  तुमच्या  नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचं काय झालं ते बघा, असं म्हणत भाजपा सरकारमध्ये असताना किती घोटाळे झाले याची यादीच भुजबळ यांनी भरसभेत वाचून दाखवली. दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO भाजप नेत्यांच्या घोटाळ्याबद्दल सोमया का बोलत नाही, असा सवाल त्यांनी केला.  अजित पवार यांनी आज भाजप संबंधित  साखर  कारखान्याची यादी दिली. सोमय्या तिकडे जा की, असा टोलाही भुजबळांनी लगावला. महाविकास आघाडीच सरकार पाडण्यासाठी त्रास दिला जातोय. अजित पवार यांच्या तीन बहिणीच्या घरावर छापे टाकले हे सगळं तोंड बंद करण्यासाठी चाललंय, असंही भुजबळ म्हणाले. आवडता शर्ट घातला नाही म्हणून पत्नी रागावली; पतीला आला तिच्या मृत्यूचा कॉल 'अडीच वर्षे मला जेलमध्ये ठेवलं कारण मी बोलतो म्हणून, पण आता ही गप्प राहणार नाही. बोलतच जाणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जातो. आज तुमची वेळ आहे. उद्या आमची येईल. ये वक्त है बदल जाता है. आज तेरा वक्त है. कल मेरा आयेंगा. हम ना बदलेंगे. वक्त के रफतार के साथ जब भी मिलेंगे रफतार वही होगी; अशी शायरी करत भुजबळ यांनी भाजपला फटकारले.
First published:

पुढील बातम्या