Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? छगन भुजबळांनीही 2 नावांवर केलं शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? छगन भुजबळांनीही 2 नावांवर केलं शिक्कामोर्तब

राज्यसभेसाठी कुणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    नाशिक, 9 मार्च : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक जवळ आल्यानंतर वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप हे पक्ष राज्यसभेसाठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नेत्या फौजिया खान राज्यसभेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याच चर्चेवर शिक्कामोर्तब करत हेच दोघे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातलं राजकीय गणित बदलल्याने त्याचा फटका भाजपला बसणार असून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तर भाजपचे फक्त दोन सदस्य निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. खडसेंसाठी महत्त्वाचा दिवस भाजप नेते एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य 11 मार्चनंतर ठरणार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंना राज्यसभेत पाठवण्यासाठी राज्यातील नेते आग्रही आहेत. मात्र स्वतः खडसे विधान परिषदेत जाण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. हेही वाचा- महिलेची तक्रार आल्यास..,अजित पवारांनी केली पोलिसांना सुचना संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. असा असणार निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26 मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 26 मार्च ला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या