ओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक

ओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाशी आघाडीसाठी बोलणी सुरू केली आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 20 जानेवारी : 'तुम्ही प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्या मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असं विधान एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी केलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाशी आघाडीसाठी बोलणी सुरू केली आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भारिपच्या नेत्यांसोबत या संदर्भात बैठक घेतली.

छगन भुजबळ यांच्यासोबतच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, विजयराव मोरे, प्रा. किसन चव्हाण, प्रा. सदानंद माळी आदी नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीला स्वत: आंबेडकर उपस्थित नसले तरीही आघाडीच्या मोठ्या नेत्यांसोबत लवकरच त्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच अनेक जागांवर प्रभाव असणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी दोन्ही काँग्रेस इच्छुक आहेत.

आघाडीबाबत काय म्हणाले होते ओवेसी?

'काँग्रेस-राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत', असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. 'प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं हव्या तितक्या जागा द्याव्यात, आपण एकही जागा लढवणार', नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. ओवसींच्या या भूमिकेचं प्रकाश आंबेडकर यांनीही स्वागत केलं आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर मी बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या तितक्या जागा द्या, मी एक ही जागा लढवणार नाही आणि यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर पण येणार नाही', अशी घोषणाच ओवेसींनी केली.

Special Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'

First published: January 20, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading