इंद्रायणीच्या तीरावर छटपूजा,वारकरीही सहभागी

इंद्रायणीच्या तीरावर छटपूजा,वारकरीही सहभागी

आज देशभर महिलांनी पहाटे सूर्याची पूजा केली. भारतात हिंदू धर्मामध्ये सूर्याला धार्मिक महत्व दिले जाते. त्यामुळे सूर्य देवतेची आराधना करण्यासाठी आज छट पूजा हा उत्सव साजरा केला जातो.

  • Share this:

पुणे,27 ऑक्टोबर: आज देशभरात छट पूजा साजरी केली जातेय. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नेपाळ अशा भारतातील पूर्व भागात हा उत्सव साजरा केला जातो. उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे आता ,ही पूजा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर छट पूजा करण्यात येते. पण पिंपरी चिंचवडमध्ये चक्क वारकरीही छटपूजेत सहभागी झालेआहेत.

आज देशभर महिलांनी पहाटे सूर्याची पूजा केली. भारतात हिंदू धर्मामध्ये सूर्याला धार्मिक महत्व दिले जाते. त्यामुळे सूर्य देवतेची आराधना करण्यासाठी आज छट पूजा हा उत्सव साजरा केला जातो. पण टाळ मृदुंगाच्या गजरातही छटपूजा केली जाते आहे. कोणतीही मूर्ती नाही, कोणत्याही ,देवतेच प्रतीक नाही, मग इथे पूजा तरी कशाची होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलं जातं. सृष्टीतील पंच तत्वांची पूजा केली जाते. छटपूजेचं हेच महत्व ओळखत वारकरीही या पूजेत अशा उत्साहाने सहभागी झाले आहेत.

तसं बघायला गेलं तर निसर्ग हाच सर्व शक्तिमान आहे, आणि छटपूजेच्या निम्मिताने ,त्या निसर्गाची उपासना करण्याचा मिळालेली ही संधी नक्कीच सुरेख असते.

First published: October 27, 2017, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading