मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; रूळ जलमय, चाकमान्यांना 'लोकलविलबां'चा फटका

VIDEO : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; रूळ जलमय, चाकमान्यांना 'लोकलविलबां'चा फटका

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडवली.

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडवली.

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडवली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 सप्टेंबर : मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याला आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम बघायला मिळाला आहे.

विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी पावसाने घोळ घातल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. दुपारपासून ऊन आणि अचानक संध्याकाळी आलेल्या पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत केली.

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडवली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अप-डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम झाला आहे. लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर सखल भागात पाणी साचले आणि नंतर नाले, गटारे चॉक झाले आहेत. यासोबतच भिवंडीतही मुसळधार पाऊस झाला. यामुळे अवघ्या दीड ते दोन तासात 100 पेक्षा जास्त दुकानात पाणी साचले आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

First published:

Tags: IMD FORECAST, Maharashtra rain updates, Mumbai rain