मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai : आता प्रवाशांची होणार रेल्वे स्थानकांवर करमणूक; 'या' रेल्वे स्थानकांवर बसवला मॅजिक मिरर, पहा VIDEO

Mumbai : आता प्रवाशांची होणार रेल्वे स्थानकांवर करमणूक; 'या' रेल्वे स्थानकांवर बसवला मॅजिक मिरर, पहा VIDEO

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैससोय होऊ नये यासाटी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न केले जातात. रेल्वे प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. अशातच लांबपल्ल्यांच्या प्रवाशांना आरामासाठी मध्य रेल्वेने स्लीपिंग पॉड्स आणि ऑगमेंटेड रिॲलिटी मॅजिक मिररची सुविधा उपलब्ध केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 09 जुलै : रेल्वेसाठी अनेकांना स्थानकांवर ताटकळत बसावे लागते. काही जण वाट पाहत बसतात तर काही जण करमणूक म्हणुन मोबाइल वर वेळ घालवत असतात. आता करमणूक म्हणुन रेल्वेने मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) (सीएसटी) स्थानकावर मॅजिक मिरर (Magic Mirror)  उभारलेला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सूचना आणि मुलांच्या मनोरंजनासाठी ऑगमेंटेड रिॲलिटी मॅजिक मिरर (Augmented Reality Magic  Mirror) बसविण्यात आला आहे. या मॅजिक मिरर मधून प्रवाशांना जंगल सफारी, बर्फाळ प्रदेशाचा अनुभव लुटता येणार आहे.   

मॅजिक मिरर म्हणजे एक टीव्ही स्क्रीन असणार आहे. जीची लांबी 7 फूट असणार आहे तर रुंदी 14 फूट असणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून टीव्ही स्क्रीन तयार करण्यात आलेली आहे. लोकांना वेळापत्रक समजावे म्हणून तिन्ही भाषेत म्हणजेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेतून हे वेळापत्रक असणार आहे. तसेच लहान मुलांना जंगल सफारी, बर्फाळ प्रदेश याचा आभासी आनंद लुटता यावा यासाठी हे तयार केले जाणार आहे.

वाचा : 'महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा दिल्लीचा विचार', 'सामना'मधून हल्लाबोल! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर टोलेबाजी

रेल्वेला किती मिळणारं महसूल 

भारतीय रेल्वेतील हा पहिला मॅजिक मिरर आहे असा दावा कंपनीने केला आहे. या मॅजिक मिरर मधून रेल्वेला लाखो रुपयांचा महसूल मिळणार आहे. हा मिरर लावण्यासाठी टाइम्स ईडर कंपनीला पाच वर्षाचे कंत्राट दिले गेले आहे. या मॅजिक मिरर मधुन जाहिराती देखिल दाखवल्या जाणार आहेत. सीएसटी स्थानकावर अनेक प्रवासी या आभासी जगाचा अनुभव घेत आहेत.

काय म्हणतात प्रवासी

प्रवासी मुजमेल म्हणाले की, "करमणूक म्हणुन हा मॅजिक मिरर खूपच चांगला आहे . यावर रेल्वे कधी सुटणार कधी निघेल याचं वेळापत्रक देखिल आहे". प्रवासी अली हसन म्हणाले की, "मॅजिक मिरर हा खूप चांगला अनुभव आहे. लहान मुलांसाठी तर हा एक चांगला प्रयोग आहे . तूम्ही आभासी जगाचा अनुभव घेऊ शकता."

वाचा : 'देवेंद्र सरकारमध्ये सहभागी होणार हे माहिती नव्हतं; हा धक्का..', अमृता फडणवीसांचा मुलाखतीत खुलासा

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, "मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नॉन फेअर रेव्हेन्यू अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॅजिक मिरर ची सुरूवात केली आहे. प्रवाशांच्या सोयी लक्षात ठेऊन जो पॅसेंजर क्षेत्र आहे. तिथे मॅजिक मिरर सूरु करण्यात आला आहे. या मॅजिक मिरर अंतर्गत आभासी प्रतीमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्ग सौंदर्य, बर्फाळ प्रदेश हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रवासी मिरर समोर उभे आहेत. त्यांना कॅमेराने कॅच करून त्यांच्या आभासी प्रतीमा बनवता येणारं आहेत. यामध्ये  प्रवाशांना एक वेगळं अनुभव घेता येणार आहे. यातून रेल्वेला चांगला महसूल देखिल मिळणार आहे."

First published:

Tags: Mumbai, Railway