Home /News /maharashtra /

मी पित नाही बिडी, मग कशाला मागेल लागेल ईडी, आठवलेंची भन्नाट कविता, VIDEO

मी पित नाही बिडी, मग कशाला मागेल लागेल ईडी, आठवलेंची भन्नाट कविता, VIDEO

'माझ्याकडे कधी ईडी येणार नाही. जरी ईडीची नोटीस मला आली तर मी गो कोरोना गो म्हणून तिला मागे पाठवले'

    शिर्डी, 28 डिसेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी (ED) नोटीसीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या नेत्यांना आणि कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आपल्या कवितेमुळे भल्याभल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas athawale) यांनी ईडीच्या नोटीसीवर भन्नाट कविता केली आहे. रामदार आठवले हे शिर्डी दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलत असताना आठवले यांना तुम्हाला ईडीची नोटीस आली का? असा सवाल विचारला असता आठवलेंनी एक भन्नाट कविताच करून टाकली. 'माझ्याकडे कधी ईडी येणार नाही. जरी ईडीची नोटीस मला आली तर मी गो कोरोना गो म्हणून तिला मागे पाठवले. तसा माझा आणि ईडीचा काही संबंध नाही. मुळात मी पित नाही बिडी मग माझ्या मागे का लागेल ईडी? ' असं आठवले यांनी म्हणताच एकच हश्या पिकली. दरम्यान, 'उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा भाजपासोबत यावं. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपसोबत येण्याची गरज असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने जाणं योग्य नाही. तुम्हाला दोन वर्षासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेईन,' असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफरच दिली आहे. पंढरपूरमधील पोटनिवडणुकीत कुणाला मिळणार उमेदवारी? अजित पवारांनी केला खुलासा 'उद्धव ठाकरे यांचे सरकार कधी जाणार, यापेक्षा आमचा प्रश्न आहे अजित पवार पुन्हा भाजपासोबत कधी येणार? याआधी सुद्धा ते आमच्या सोबत आलेले आहेत. फडणवीस म्हणतात की पुन्हा येईन.. अजित दादा आले तर पुन्हा येणार हे त्यांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच जाणार असून तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम न करता एकमेकांवर टीका करत आहेत,' असंही आठवले यांनी सांगितलं आहे. युपीए नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याची शक्यता व्यक्त करत हे सरकार पडलं की आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या