सोलापूर, 6 डिसेंबर: साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांवर काळानं झळप घातली. पाटखळ-खुपसंगी मार्गावर सिमेंट टॅंकर व दुचाकीच्या भीषण अपघातात (Major Accident) दोन तरुणांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalvedha, Solapur) तालुक्यात खोमनाळ येथे शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली. गोविंद बुरुंगे आणि चिल्लपा बुरुंगे अशी मृताची नावे आहेत.
हेही वाचा...अल्पवयीन मुलीला मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवत होता बाप, तसेच...
मिळालेली माहिती अशी की, गोविंद आणि चिल्लपा हे दोघे खोमनाळ हिवरगाव येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याला गेले होते. ते परत बुरुंगेवाडीकडे येत असताना पाटखळ गावाजवळ त्यांच्या दुचाकीला सिमेंट वाहून नेणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की, गोविंद आणि चिल्लपा जवळपास 20 फूट अंतरावर फेकले गेले. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेनंतर बुरुंगेवाडी जवळा येथे शोककळा पसरली आहे.
लग्नाला आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला
दरम्यान, अशीच घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. भरधाव डंपरनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघात एका दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला. भुसावळ शहरातील खडका चौफुलीवरवर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मृत दाम्पत्य बुलढाणा येथील असल्याची माहिती मिळाली आहे. ते भुसावळला लग्नासाठी आले असता त्यांच्यावर काळानं घाला घातला.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झालं. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास झाला. चंद्रकांत वराडे (वय-62) आणि संध्या वराडे (वय-58) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत.
हेही वाचा..साताऱ्यात साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, कामगाराचा होरपळून मृत्यू
वराडे दाम्पत्य हे बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील रहिवासी होतं. ते काल (गुरुवारी) आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी भुसावळात आले होते. त्यांच्या नातेवाईकाचे आज (शुक्रवारी) लग्न होतं. लग्नासाठी भुसावळ शहरातील विवाहस्थळी ते आपल्या दुचाकीनं (एमएच 28, एसी 6671) जात होते. त्याचवेळी खडका चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या डंपरनं (एमएच 19 झेड 3192) जोरदार धडक दिली. त्यात वराडे दाम्पत्य थेट डंपरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Road accident, Solapur