आदित्य ठाकरेंच्या सभेत नेत्याचं पाकिट चोरणाऱ्याला 'सैनिकां'नी दिला चोप

आदित्य ठाकरेंच्या सभेत नेत्याचं पाकिट चोरणाऱ्याला 'सैनिकां'नी दिला चोप

चोरट्याचा डाव उलटला आणि शिवसैनिकांनी चोरट्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 20 जुलै :  नेत्यांच्या सभा म्हटलं की त्याला हमखास गर्दी होते. ही गर्दी चोरट्यांसाठी मोठी पर्वणी असते. आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकेर यांची नाशिकमध्ये सभा होती. त्या सभेला गर्दीही चांगली होती. त्याचा फायदा घेत पाकिटमार चोरट्याने काही नेत्यांच्या खिश्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र अशाच एका प्रयत्नात एक चोरटा पकडला गेला आणि शिवसैनिकांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली.

आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान पाकिटमारांचा सुळसुळाट दिसून आला. नाशिकच्या खुटवड नगर येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. आदित्य ठाकरे हे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यावर स्थानिक नेते पदाधिकारी आणि नागरसेवकांनी आदित्य ठाकरेंचं स्वागत केले मात्र स्वागत करतेवेळी पाकीटमार हे या गर्दीचा फायदा उचलत होते.

VIDEO : 'सहज गर्दी बघायला गेलो आणि भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं'

पाकीटमार चोरट्याने स्थानिक नगरसेवक दिलीप दातीर यांच्या खिश्यावरच डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याचा हा डाव फसला दातीर यांच्या हा प्रकार लक्षात येताच दातीर आणि शिवसैनिकांनी चोरट्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान काही जणांकडून आपल्या खिशातून पैसे गायब झाल्याच्याही नंतर तक्रारी आल्या. पोलीस आता त्या भामट्याची चौकशी करत असून चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय.

मुख्यमंत्रिपदाच्या वादावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद' यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचली. आदित्य यांच्या यात्रेदरम्यान त्यांना हमखास प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे युतीचं राज्य पुन्हा आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? त्यामुळे आदित्यच आता प्रत्येक सभेत त्यावर आपलं मत व्यक्त करताहेत. मी मुख्यमंत्री बनावं याकरिता जन आशीर्वाद यात्रा नाही तर मला महाराष्ट्र  सुजलाम सुफलाम घडवायचा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर नेत्यांनी बोलू नये अशी तंबी दिली होती.

आनंदीबेन पटेल UPच्या राज्यपाल, धनखड ठेवणार 'दीदीं'च्या कारभारावर लक्ष

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मी मुख्यमंत्री बनावं याकरिता जन आशीर्वाद यात्रा नाही. मला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचा आहे.1995 मध्ये नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन झाले आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा त्यासाठी नाशिकला आलोय.

शिवसेनेवर, सेनेच्या नेत्यांवर जनता प्रचंड प्रेमकरतेय. आपल्या कामानी, मेहनतीने महाराष्ट्र भगवा होणार. युतीची सत्ता पुन्हा येणार, दुष्काळ मुक्त, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. कार्यकर्त्यांची ताकद, उत्साह जल्लोश पुढे घेऊन जाणार आहे असं आदित्य यांनी सांगितलं.

First published: July 20, 2019, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading