Home /News /maharashtra /

सुपरवायझरने काम सांगितल्याचा आला राग, ऊस तोडण्याच्या कोयत्याने केला सपासप वार, अंगावर शहारे आणणारा VIDEO

सुपरवायझरने काम सांगितल्याचा आला राग, ऊस तोडण्याच्या कोयत्याने केला सपासप वार, अंगावर शहारे आणणारा VIDEO

अहमदनगरच्या एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमध्ये ही घटना घडली

अहमदनगर, 23 जानेवारी : अहमदनगरमधील एमआयडीसीमध्ये एका सुरक्षारक्षकाने सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. राजाराम नामदेव वाघमारे असं हत्या झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीमध्ये ही घटना घडली. सुरक्षारक्षक किरण रामभाऊ लोमटे याने ऊस तोडणीच्या कोयत्याने वाघमारे यांच्यावर वार करून हत्या केली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. सकाळी सुरक्षारक्षक लोमटे कामावर आला असता सुपरवायझर वाघमारे यांनी नियमानुसार लोमटे याला कामाची सुचना दिली. कामाच्या सुचना देऊन देखील लोमटे कामावर हजर झाला नाही. त्यानंतर लोमटे हा कंपनी बाहेर गेला. थोड्यावेळाने तो पुन्हा कंपनीमध्ये आला त्यावेळी त्याच्या हातात ऊस तोडण्याचा कोयता होता. त्याने थेट राजाराम वाघमारे यांच्याकडे धाव घेतली आणि कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आणि पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजाराम वाघमारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आरोपी किरण लोमटे विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लोमटे फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळीने एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. दीपक भोईर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उल्हासनगरच्या नेहरू चौक परिसरात माणेरे गावात राहणाऱ्या दीपक भोईर या तरुणांची पाच ते सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली. हत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अंगावर शहरे आणणारा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या त्याच्याच ओळखीच्या नरेश उर्फ बबल्याने केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपक भोईरचा खून करण्यासाठी त्याच्याच मित्रांनी सापळा रचला होता. शहरातील दुर्गा बारमध्ये दीपकला एका मुलीनं फोन करून बोलावलं होतं. दीपक बारमध्ये पोहोचला आणि संबंधित मुलीची भेट घेतली. त्यानंतर बारमधून बाहेर आल्यानंतर दबा धरून बसलेल्या नरेश उर्फ बबल्या आणि त्याच्या मित्रांनी दीपकवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी दीपकने पळ काढला. हल्लेखोरांनी चाकू-तलवार घेऊन त्याचा पाठलाग केला. काही अंतर दूर गेल्यानंतर दीपक खाली कोसळला. पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी दीपकवर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. यात त्याचा जागीत मृत्यू झाला. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. उल्हासनगरमध्ये वर्षभरात १७ हत्या उल्हासनगर झोन ४ चारमध्ये वर्षभरात १७ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण करण्यात उल्हासनगर पोलीस पूर्णपणे अपयशी ठरेल आहेत. हे अधोरेखित होतंय. व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर ओळख आता पुन्हा गुन्हेगारी शहर म्हणून होत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी या शहरात प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या