सीबीएसईचा विद्यार्थी निघाला दरोडेखोर, लुटलं होतं तब्बल 10 लाखांचं सोनं-चांदी!

सीबीएसईचा विद्यार्थी निघाला दरोडेखोर, लुटलं होतं तब्बल 10 लाखांचं सोनं-चांदी!

गोपाळपूर परिसरात एकाच दिवशी ८ घरफोडीचे प्रकरणे घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 10 डिसेंबर : विठुरायाच्या नगरीत एक चोर पकडला. पण हा चोर सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकणारा अल्पवयीन विद्यार्थी असून तो दरोडेखोरांच्या टोळीत सापडला आहे. या टोळीने आतापर्यंत 8 ठिकाणी घरफोड्या केल्यात. यात तब्बल 10 लाख रुपयांचं 20 तोळे सोनं आणि 1 किलो चांदी हस्तगत करण्यात आलं आहे.

पंढरपूर शहरात काही दिवसांपासून घरफोडी आणि चोरीचे प्रकार वाढले असतानाच आणि सोमवारी गोपाळपूर परिसरात एकाच दिवशी ८ घरफोडीचे प्रकरणे घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

सोमवारी गोपाळपूर परिसरात ८ ठिकाणी घरफोडीचे प्रकरणे घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  अखेर पोलिसांनी एका सीबीएसईच्या विद्यार्थ्यासहीत घरफोडी करणारे अट्टल चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. निलेश हनुमंत भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून इतर आरोपी  शोएब अख्तर नदाफ, मुन्ना भिमराव मागाडे, अविनाश रेखिराम वाघमारे आणि एक सीबीएसईत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील  आणि उपअधीक्षक सागर कवडे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या टीमने कारवाई करून या टोळीला जेरबंद केले.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद गावडे यांच्या टीमने काही तासातच घरफोडी करणारे टोळी जेरबंद केल्यानं शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 10, 2019, 6:08 PM IST
Tags: pandharpur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading