CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नाहीत, वेळापत्रकानुसार घेण्यात येतील

CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नाहीत, वेळापत्रकानुसार घेण्यात येतील

चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशभरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च: चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशभरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच कोरोनाचा धोका लक्षात घेत आता CBSE बोर्डाने 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे वृत्त झळकले होते. मात्र, बोर्डाचे सेक्रेटरी गेरी अरथून यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. तो म्हणजे CBSE बोर्डाच्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नाहीत, वेळापत्रकानुसार घेण्यात येतील, अशी माहिती गेरी अरथून यांनी दिली आहे.

हेही वाचा...सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला काही कठोर निर्णयही घ्यावे लागले आहेत. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यत बंद ठेवण्यात आली आहे. IIT आणि इतर केंद्रीय संस्थांसाठी आवश्यक प्रवेश परीक्षा JEE सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 31 मार्चनंतर परीक्षांच्या तारखेसंदर्भातले निर्णय कळवले जातील.

हेही वाचा...इंजिनिअर महिलेस अश्लील शिविगाळ, अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याविरुद्ध गुन्हा

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल

1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील.

2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.

4. दुकानांच्या वेळा ठरविणार

शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

5. साधनसामुग्रीची उपलब्धता

दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

First published: March 19, 2020, 10:17 AM IST

ताज्या बातम्या