मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

FIR Against Anil Deshmukh: नागपूरच्या घराबाहेर पीपीई किटमध्ये CBI चे अधिकारी, अनिल देशमुखांना ताब्यात घेणार?

FIR Against Anil Deshmukh: नागपूरच्या घराबाहेर पीपीई किटमध्ये CBI चे अधिकारी, अनिल देशमुखांना ताब्यात घेणार?

FIR Against Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात FIR ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. दरम्यान यानंतर अनिल देशमुखांना सीबीआय ताब्यात घेणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नागपूर, 24 एप्रिल: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड आहे.  खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

दरम्यान मुंबई, नागपूरसह अनिल देशमुखांच्या विविध घरांवर छापेमारी केली जात आहे. नागपूरच्या घराबाहेर पीपीई किटमधील अधिकारी देखील पोहोचले आहे. राज्याच्या माजी गृहमंंत्र्यांना आज सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. याठिकाणी सीबीआयचे तीन वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत, ते आजच अनिल देशमुखांना ताब्यात घेऊ शकतात. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणाऱ्या घरांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. वरळी येथील सुखदा इमारतीत अनिल देशमुख यांचे घर आहे, त्या ठिकाणीही छापा घालण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयची विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

(हे वाचा-BREAKING: अनिल देशमुखांविरोधात CBI ने दाखल केला FIR, खंडणी प्रकरणात कारवाई)

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या होत्या. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील (Petitioner Dr Jaishri Patil) यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते कि, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.

या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे कि, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे, त्यानंतर आज सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार विरोधकांकडून केला जातोय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी दिली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील असे म्हटले आहे की, ईडी, सीबीआय यांचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन वापर होतो आहे. एका पत्रावर एवढी कारवाई होऊ शकते का असा सवाल त्यांनी विचारला आहे.

First published:

Tags: Anil deshmukh, CBI, Maharashtra, Maharashtra News, Uddhav thackeray