सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयावर सीबीआयचे छापे, 75 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयावर सीबीआयचे छापे, 75 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप

सेंट्रल बँकेकडून घेतलेले 75 कोटी रुपये बेकायदेशीरपणे अन्यत्र वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता

  • Share this:

21 एप्रिल : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयांवर सीबीआयने शुक्रवारी छापे मारून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे मुंबई रस्ता आदी ठिकाणी असलेल्या कार्यालयात छापे टाकण्यात आले आहेत.

सिंहगड इन्स्टिट्यूट आणि संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध सेंट्रल बँकेकडून घेतलेले 75 कोटी रुपये बेकायदेशीरपणे अन्यत्र वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे मारून महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली. नवले यांच्या घराची झडती घेण्याचं कामही सध्या सुरू आहे. त्यांची बँक खाती आणि लोकर्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 05:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading