मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी! शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या रिसॉर्टवर CBI ची धाड

मोठी बातमी! शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या रिसॉर्टवर CBI ची धाड

सरनाईक यांच्या  खंडाळा रिसॉर्टवर सीबीआयनं छापा (CBI Raid on Pratap Sarnaik resort) टाकला आहे.

सरनाईक यांच्या खंडाळा रिसॉर्टवर सीबीआयनं छापा (CBI Raid on Pratap Sarnaik resort) टाकला आहे.

सरनाईक यांच्या खंडाळा रिसॉर्टवर सीबीआयनं छापा (CBI Raid on Pratap Sarnaik resort) टाकला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

पुणे 18 मे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या  खंडाळा रिसॉर्टवर सीबीआयनं धाड (CBI Raid on Pratap Sarnaik resort) टाकली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत प्रताप सरनाईक कुठे गायब आहात? असा सवालही केली आहे.

ईडीनेही याआधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिवसेना आमदार सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. मात्र, हे प्रकरण नंतर थंडावलं होतं. मात्र, अशात आता सीबाआयनं सरनाईक यांच्या रिसॉर्टवर पुन्हा धाड टाकल्यानं प्रकरणाला पुन्हा नवं वळण येणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: CBI, Pratap sarnaik