• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • परमबीर सिंग यांची बदली ते देशमुखांविरोधात FIR! महिनाभरात याप्रकरणी घडल्या मोठ्या घडामोडी

परमबीर सिंग यांची बदली ते देशमुखांविरोधात FIR! महिनाभरात याप्रकरणी घडल्या मोठ्या घडामोडी

FIR Against Anil Deshmukh: परमबीर सिंग यांची बदली, त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि आज अनिल देशमुखांविरोधात दाखल झालेला FIR, जाणून घ्या या प्रकरणातील महत्त्वाच्या घटनांची Timeline

  • Share this:
aमुंबई, 24 एप्रिल: अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात 100 कोटींच्या खंडणीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, नागपूर येथील घरात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयने (CBI) अनिल देशमुख यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर एफआयआर दाखल (FIR Against Anil Deshmukh) झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड आहे. दरम्यान सध्या देश कोरोनाशी लढत आहे, अशावेळी केंद्र सरकार अपयश लपवण्यासाठी ही कारवाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केली जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई-नागपूरसह विविध भागात छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. दरम्यान गेल्या महिभरात घडलेल्या या घडामोडींचा घटनाक्रम कसा होता जाणून घ्या- 17 मार्च- मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आणि हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली कार लावण्याच्या आरोपाखाली गुंतलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वझे यांना अटक करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांची बदली. 20 मार्च-परमबीर सिंग यांचं 100 कोटींचा आरोप करणार मुख्यमंत्र्यांना पत्र बदली झाल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांनी शंभर कोटी रुपये दर महिन्याला बार मालकाकडून  कमावून द्या असं सांगितल्याचा आरोप केला. परम बीर सिंग यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर आरोप केला होता की, देशमुख यांनी निलंबित मुंबई पोलिस सचिन वाझे यांना शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणीच्या रकमेत 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते. 5 एप्रिल- कोर्टाचे देशमुख यांच्या चौकशीचे आदेश सकाळी उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले.अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर कोर्टाने सुनावणी करत चौकशीचे आदेश 5 एप्रिल दुपारी- अनिल देशमुखांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा कोर्टाने सीबीआयला चौकशीचे आदेश देताच काही तासांतच देशमुखांनी राजीनामा दिला. राजीनामा सादर केल्यानंतर देशमुख सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी संध्याकाळीच ताबडतोब दिल्लीला गेले. 14 एप्रिल- सीबीआयने केली अनिल देशमुखांची चौकशी समन्स बजावत अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांची मुंबईतील येथे डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे जवळपास दहा तास चौकशी चालली आणि जिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. 23 एप्रिल-अनिल देशमुखांच्या विरोधात एफआयआर दाखल सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्यांनातर त्यानंतरच सीबीआयने गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं जवळजवळ तीन आठवडे चाललेल्या या तपासादरम्यान सीबीआयच्या हाती काही भक्कम पुरावे लागलेत. त्याच बरोबर ज्या काही लोकांच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं होतं त्यांनीसुद्धा परमविर सिंह यांच्या आरोपाला दुजोरा दिल्याचं  सीबीआय सूत्र सांगत आहे. 24 एप्रिल- देशमुखांच्या घरं-कार्यालयाती सीबीआयची छापेमारी आज सकाळी 7-30 वाजता देशमुखांच्या वरळी, नागपूर आणि ज्ञानेश्वरी ठिकाणी याठिकाणी सीबआयने छापेमारी केली. सध्या देशमुख यांच्या ठिकाणावरून डॉक्युमेंट्स, डिजिटल एव्हिडन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न सीबीआय द्वारा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनिल देशमुखांना नागपूर येथील घरात ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी पुन्हा चौकशी केली जाणार आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: