मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Disha Saliyan : दिशा सालियान प्रकरणात नवा ट्विस्ट, एसआयटीच्या घोषणेनंतर सीबीआयचं स्पष्टीकरण

Disha Saliyan : दिशा सालियान प्रकरणात नवा ट्विस्ट, एसआयटीच्या घोषणेनंतर सीबीआयचं स्पष्टीकरण

दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. यानंतर आता सीबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. यानंतर आता सीबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. यानंतर आता सीबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण एकमेकांशी जोडलेलं असल्याचा आरोप राणे कुटुंबाकडून करण्यात येत होता, तसंच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करताना सीबीआयने दिशा सालियानच्या मृत्यूचीही चौकशी केल्याचा दावा केला गेला, पण याबाबत आता सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

सीबीआयने दिशा सालियान प्रकरणाचा तपास केला नाही, कारण ही केस सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं सीबीआयने स्पष्ट केलं आहे.

नाइट पार्टी, कॉकटेल अन् मृत्यू; दिशा सालियनच्या फ्लॅटमध्ये त्या रात्री काय घडलं?

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामध्येही दिशा सालियान प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले, यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा सभागृहात केली, तसंच दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे नव्हतं. सीबीआयकडे फक्त सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण होतं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला. आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

राहुल शेवाळे यांनी लोकसभेमध्ये बोलताना सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीला AU नावाने बरेच कॉल आहे. हा AU म्हणजे नेमका कोण? याचा तपास होणं गरजेचं आहे, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली.

'AU' बद्दल खुद्द रियानेच केला मोठा खुलासा, शिंदे गट आणि भाजपच्या दाव्यातून काढली हवा

First published:

Tags: CBI