मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /झोपलेल्या कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी मांजरीचा विषारी नागाशी अर्धातास लढा, जळगावातील थरारक घटना

झोपलेल्या कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी मांजरीचा विषारी नागाशी अर्धातास लढा, जळगावातील थरारक घटना

मध्यरात्री घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, घरात शिरणाऱ्या चार फुटी कोब्रा नागाशी (Cobra snake) एका मांजरीनं तब्बल अर्धा तास लढा (Cat fights poisonous snake) दिला आहे.

मध्यरात्री घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, घरात शिरणाऱ्या चार फुटी कोब्रा नागाशी (Cobra snake) एका मांजरीनं तब्बल अर्धा तास लढा (Cat fights poisonous snake) दिला आहे.

मध्यरात्री घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, घरात शिरणाऱ्या चार फुटी कोब्रा नागाशी (Cobra snake) एका मांजरीनं तब्बल अर्धा तास लढा (Cat fights poisonous snake) दिला आहे.

जळगाव, 09 जुलै: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पिंप्राळा याठिकाणी हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मध्यरात्री घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, घरात शिरणाऱ्या चार फुटी कोब्रा नागाशी (Cobra snake) एका मांजरीनं तब्बल अर्धा तास लढा (Cat fights poisonous snake) दिला आहे. मांजरीच्या सतर्कतेमुळे घरात झोपलेल्या कुटुंबाचे प्राण वाचले आहेत. अन्यथा मोठा अनर्थ  घडला असता. मांजरीनं आपल्या अंगावरचे सगळे केस उभे करत पंजाच्या साहाय्यानं कोब्रा नागाचा रस्ता अडवून धरला होता. दरम्यान कोब्रा नागानं देखील मांजरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या स्मशान शांततेत कोब्राच्या फुत्कारण्याचा आवाज घरात सर्वत्र घुमत होता.

पिंप्राळा येथील रहिवासी असणाऱ्या प्रशांत कोळी यांच्या घरात बुधवारी मध्यरात्री तीन ते चार फुटाच्या कोब्रा नागानं घरात प्रवेश केला होता. पण घरातील पाळीव मांजरीनं कोब्राचा मार्ग अडवून धरला. कोब्राशी लढा देत त्याला एकाच ठिकाणी अडवून धरले. यानंतर कुटुंबातील सदस्यांना जाग आली आणि त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. घरात कोब्रानं प्रवेश केल्याच समजताच कोळी कुटुंबांनी शेजारी राहणाऱ्या सर्प मित्राला बोलावून नागाला पकडण्यात आलं आहे.

हेही वाचा-सिलिंडरसोबत सापाचीही होम डिलिव्हरी, VIDEO पाहून व्हाल हैराण

काळ बनून कोळी कुटुंबाच्या घरात शिरलेल्या कोब्रा नागाशी लढा देऊन मांजरीनं एकप्रकारे कुटुंबाचे प्राणचं वाचवले आहेत. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. दरम्यान घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. तेव्हा अनंत कोळी यांच्या मुलाला घरात नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला. पहिल्यांदा त्यानं झोपेत असल्यानं आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण काळोख रात्रीच्या स्मशान शांततेत फुत्कारण्याचा आवाज वाढतच गेला.

हेही वाचा-Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि...

यामुळे आवाजाच्या दिशेनं जाऊन पाहिलं असता, कोळी यांच्या मुलाचा काळजाचा ठोका चुकला. घरातील पाळीव मांजर एका 3 ते चार फुट लांबीच्या विषारी कोब्रा नागाशी लढा देत असल्याचं त्यानं पाहिलं. यानंतर त्यानं घरातील अन्य सदस्यांना उठवलं. यानंतर घरातील सदस्यांनी सर्पमित्राला बोलावून सापाला पकडलं आहे. यानंतर कोब्रा नागाची सुरक्षित ठिकाणी सुटका केली आहे.

First published:
top videos

    Tags: Jalgaon, Snake