जालन्यात खळबळ: आरोग्य अधिकाऱ्याच्याच गाडीत सापडल्या दारुच्या बाटल्या

शासकीय वाहनातून तपासणीदरम्यान 6 लाख 70 हजारांची रोकड आणि दारूच्या बाटल्या सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

शासकीय वाहनातून तपासणीदरम्यान 6 लाख 70 हजारांची रोकड आणि दारूच्या बाटल्या सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

  • Share this:
जालना, 18 एप्रिल: औरंगाबाद हद्दीतील वरुडी चेकपोस्टवर एका आरोग्य अधिकाऱ्याच्या शासकीय वाहनातून तपासणीदरम्यान 6 लाख 70 हजारांची रोकड आणि दारूच्या बाटल्या सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीदरम्यान एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये, म्हणून पोलिस प्रत्येक वाहनावर लक्ष ठेऊन आहेत. पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी जालना-औरंगाबाद मार्गावरील वरुडी चेकपोस्टवर एक शासकीय वाहन (एमएच. 20-सीयू-0353) क्रमांकाची इर्टीगा कार आला. या गाडीबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता त्यात 6 लाख 70 हजारांची रोकड आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या. हेही वाचा.. लॉकडाऊन असतानाच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद संबंधित शासकीय वाहन हे औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांचे असून ते स्वतः त्यावेळी गाडीत हजर होते. बदनापूर पोलिसांनी याप्रकरणी डॉ. अमोल गीते विरोधात मुंबई पोलीस कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉ. अमोल गीते यांच्या ताब्यातून 6 लाख 70 हजारांची रोकड, दारूच्या बाटल्या आणि 6 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 12 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोरोनाच्या संचारबंदीच्या काळात अश्याप्रकारे एका शासकीय आरोग्य अधिकाऱ्याकडे अशाप्रकारे रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या सापडल्याने आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडली आहे. हेही वाचा...औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म संपादन- संदीप पारोळेकर
First published: