पंढरपूर, 08 जानेवारी : पंढरपूरमध्ये (Pandharpur) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी (Shivsena) भाजपच्या (BJP) माजी शहराध्यक्षाला मारहाण केली होती. या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूरमध्ये शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे विज बिल विरोधात आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ शब्दांचा वापर केला. त्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली.
#पंढरपूर मध्ये #शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग . सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द #पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत #शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते pic.twitter.com/j8KIKetAZF
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) February 7, 2021
याचा जाब विचारण्यासाठी पंढरपूर शिवसेना माजी अध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यांची नामदेव पायरी ते पश्चिमद्वार अशी धिंड काढण्यात आली. कटेकर यांच्या हातात बांगड्या, हार, बुक्का लावून या वक्तव्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडून करण्यात आला होता.
व्हॅलेंटाईनला सुरुवात होताच मुंबई हादरली,तरुणीने प्रेयसीला पेटवले अन् तिने मिठी
त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करून कारवाईची मागणी केली होती. अखेर या प्रकरणी 25 शिवसैनिकांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप केंदळे, रवी मुळेसह 25 शिवसैनिकांवर पंढरपुर शहर पोलrस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पंढरपूरमध्ये भाजप-शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Pandharpur news, Shivsena, Uddhav Thackery